इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT बॉम्बे) संस्थेचा वार्षिक परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर केले. मात्र, यात नाटकात त्यांनी राम आणि सीता यांचा अपमान केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी संस्थेने कठोर पावले उचलत विद्यार्थ्यांना दंड ठोठावला आहे.
आयआयटी बॉम्बेचा ३१ मार्च रोजी वार्षिक कला मोहोत्सव पार पडला. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर केलं. पण या नाटकात सीता आणि राम यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल हा आयआयटी बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. कॅम्पसच्या ओपन-एअर थिएटरमध्ये हे नाटक सादर करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत, या नाटकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये रामायणातील पात्रांचा अपमान झाल्याचे लक्षात आले. या नाटकातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संस्थेने याची दखल घेत. विद्यार्थ्यांना मोठा दंड ठोठावला आहे.
हे ही वाचा..
केवळ ६ हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना दिला आश्रय!
दिल्ली अबकारी प्रकरणात १०० कोटी रुपयांची मागितली लाच!
व्हॉट्सअप स्टेटसवर गोहत्येचे छायाचित्र लावल्यानंतर संतप्त हिंदूंची निदर्शने!
दिल्लीत ४८ तासांत उष्णतेमुळे ५० बेघर लोकांचा मृत्यू
‘राहोवन’ नाटकातील आक्षेपार्ह प्रसंगांच्या तक्रारींनंतर शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आलं. या कालावधीत बराच विचारविनिमय केल्यानंतर समितीनं कठोर कारवाईचा निर्णय घेतला. या अंतर्गत वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्युनियर विद्यार्थ्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याप्रकरणी सात विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आयआयटी बॉम्बेकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.