जवळपास २० वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला भारतात आणण्यात आले आहे. त्याला मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास चीनमधून भारतात आणले गेले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी ताबा घेतला. चीन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
प्रसाद पुजारी याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्यावर शेवटचा गुन्हा दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होते. हद्दपारीला उशीर करण्यासाठी पुजारीने एका चिनी महिलेशी लग्न केले. परंतु शहर गुन्हे शाखेने त्याला मुंबईत आणण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. तब्बल २० वर्षांनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
अटकेपासून वाचण्यासाठी पुजारीने चीनमधील एका महिलेशी लग्न केले होते. मात्र, त्याला पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरुच होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी तब्बल २० वर्ष लागले. २०२० मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पुजारीच्या आईला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली होती.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; १४० जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!
मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर १९ डिसेंबर २०१९ रोजी गोळबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचे नाव पुढे आले होते. गोळीबारात जाधव यांना गोळी चाटुन गेली होती. मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते. तेव्हा पासुन प्रसाद पुजारी चीन मध्येच स्थायिक होता.