हिंदू देवांना शिविगाळ करून मुस्लिम मित्रांची हिंदू मुलांना मारहाण

हिंदू देवांना शिविगाळ करून मुस्लिम मित्रांची हिंदू मुलांना मारहाण

हिंदू देवदेवतांना शिविगाळ करून दोन अल्पवयीन हिंदू मुलांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत मंगळवारी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, १८६० अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन लहान मुलांना मारहाण करणाऱ्यांमध्ये मुस्लिम समाजातील दोघे सज्ञान आणि चार अल्पवयीनांचा समावेश आहे. हिंदू मुलांच्या वडिलांनी मारहाणीची तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील काशिगाव भागात ३० मार्च रोजी ही घटना घडली. या मुलांचा मुस्लिम अल्पवयीन मित्र त्यांच्याकडे खेळायला आला होता. मात्र अचानक दोघांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. त्यानंतर मुस्लिम मुलाने हिंदू मुलाला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने हिंदू मुलाला धमकी देऊन तुला मारहाण केल्यास कोणीही हिंदू देवता तुला वाचवायला येणार नाही, असेही म्हटले. ३१ मार्चला याबाबत मुलाने आपल्या पालकांना आणि मित्रांना सांगितले. त्यानंतर आरोपी मुलगा अन्य पाच जणांना घेऊन आला. त्यांनीही पीडित मुलगा आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली.

१ एप्रिल रोजी हिंदू मुले शाळेत जात असताना सहा आरोपींना त्यांना घेराव घातला आणि त्यांना मारहाण केली. त्यात दोघे सज्ञान तर, चार अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्दही वापरले. ‘तुम्ही हिंदू असेच असतात. तुम्हाला अशीच वागणूक दिली पाहिजे. तुमचा कोणीच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही’, असे आरोपींनी म्हटल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल सिद्दारमय्या यांच्या मुलाविरोधात तक्रार

ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’

कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

‘माझ्या मुलांवर सहा मुस्लिमांनी क्रूरपणे हल्ला केला. त्यांनी हिंदू देवांनाही शिवीगाळ करून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे इथे खूप दिवसांपासून होत आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. आज मी या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस केले. हिंदू समाजाचा आणि देवांचा अनादर खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,’ असे या हिंदू मुलांच्या वडिलांनी सांगितले.

Exit mobile version