ईडीने केलेल्या चौकशीत सिंगापूरच्या मे. गॅलक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स प्रा. लिमिटेड आणि होरायझन शिपिंग अँड लॉजिस्टिक्स प्रा. लिमिटेड कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवले गेल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपनी परिसरात छापे टाकण्यात आले. ईडीने या कंपन्यांशी संबंधित ४७ बँकखाती गोठवली आहेत.
कंपनीवर मारलेल्या छाप्यात दोन कोटी ५४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यातील बहुतेक पैसे वॉशिंग मशिनमध्ये लपवले होते, असे उघडकीस आले आहे.
छापेमारीची कारवाई दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकात्यात झाली. ईडीच्या पथकाने मे. कॅप्रिकोर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक्स प्रा. लिमिटेड आणि त्यांचे संचालक विजयकुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्यावर फेमा, १९९९ नियमांतर्गत छापा टाकला. तसेच, त्यांच्याशी संबंधित संस्था मे. लक्ष्मीटन मेरिटाइम, मे. हिंदुस्तान इंटरनॅशनल, मे. राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, मे. स्टवार्ट अलॉयज इंडिया, मे. भाग्यनगर लिमिटेड, मे. विनायक स्टील्स लिमिटेड, मे. वसिष्ठ कन्स्ट्रक्शन आणि त्यांचे संचालक संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्या घरावर छापा टाकला.
हे ही वाचा:
‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल
अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला
‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण
पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल
कॅप्रिकोर्नियन शिपिंग कंपनी आणि लक्ष्मीटन मेरिटाइम कंपन्यांनी बनावट मालवाहतूक व आयातीच्या आडून सिंगापूरच्या कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवले होते. यासाठी नेहा मेटल्स, अमित स्टील, ट्रिपल मेटल अँड अलॉयज, एचएमएम मेटल्स आदी बनावट संस्थांच्या मदतीने हा व्यवहार दाखवण्यात आला, असा दावा ईडीने केला आहे. तपासादरम्यान दोन कोटी ५४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यातील मोठी रक्कम वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आली होती. ती जप्त करण्यात आली आहे. तसेच, तपासादरम्यान मिळालेली काही आक्षेपार्ह उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.