25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामामोबाइलच्या व्यसनाने घेतला जीव

मोबाइलच्या व्यसनाने घेतला जीव

Google News Follow

Related

मोबाइलचे व्यसनामुळे एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. गुजरातच्या सूरत येथे राहणाऱ्या २० वर्षीय मुलीने या व्यसनामुळे आत्महत्या केली. तिचे कुटुंबीय तिला लागलेले व्यसन सोडवण्यासाठी औषधोपचार करत होते. मात्र मुलीने हे टोकाचे पाऊल उचललल्याने तेही कोलमडले आहेत.

सूरत शहरातील गोपीपुरा भागात राहणाऱ्या विशाखा राणा या मुलीला मोबाइलचे व्यसन लागले होते. कुटुंबातील व्यक्ती त्यामुळे खूप त्रासल्या होत्या. मात्र तिचे व्यसन सुटता सुटत नव्हते. अखेर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले.

मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्यावर उपचाराला सुरुवातही केली होती. मात्र त्याचा काही फरक जाणवत नव्हता. याच दरम्यान ती इंटरनेटच्या मदतीने चेहऱ्याचा व्यायाम करू लागली होती. त्यामुळे ती मान आणि तोंड वाकडे करून बोलायला लागली होती. हे पाहून तिचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी तिचा चेहरा व्यवस्थित असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. जवळपास दोन महिने तिने औषधेही घेतली.

हे ही वाचा:

क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!

कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!

ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे हावभाव बदलले!

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

मोबाइलचे व्यसन कमी केले तर ती बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे गेले एक-दोन महिने तिला मोबाइल दिला जात नव्हता. शनिवारी ती कारखान्यात काम करण्यासाठी गेली होती. तिथून ती दुपारी परतली. त्यानंतर तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंब हादरले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा