30 C
Mumbai
Monday, January 20, 2025
घरक्राईमनामाबेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

Google News Follow

Related

बेंगळुरू कॅफे स्फोटातील दोन संशयितांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुसाविर हुसैन शाझिब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आईडी स्फोटके ठेवल्याचा संशय आहे तर, अब्दुल माथीन अहमद ताहा हा या स्फोटाच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. हे दोघेही सन २०२०मधील एका दहशतवाद प्रकरणात पोलिसांना हवे आहेत. १ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात १० जण जखमी झाले होते.

याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने info.blr.nia@gov.in किंवा फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन एनआयएने दिले आहे. शाझिब हा ओळख लपवण्यासाठी मोहम्मद जुनेद सय्यद असे नाव वापरत असे. तर, ताहा हा स्वतःला हिंदू म्हणून दाखवत असे. त्यासाठी त्याने कागदपत्रांमध्येही फेरफार केला होता. आधार कार्डमध्ये त्याने त्याचे नाव विघ्नेश असे ठेवले होते, असे एनआयएने सांगितले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाहीदेखील एनआयएने दिली आहे.

हे ही वाचा:

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

बेंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएने या स्फोटाचा कट रचणाऱ्या मुझम्मिल शरीफ याला गुरुवारी अटक केली होती. त्यासाठी एनआयएने कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील तब्बल १८ ठिकाणी शोधसत्र राबवले होते. १७ मार्च रोजी शरीफसह तीन संशयितांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. तसेच, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची दुकाने आणि घरांवरही छापा टाकण्यात आला होता. शरीफ याने स्फोटके तयार करण्याची सामग्री पुरवल्याचा एनआयएचा संशय आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
224,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा