बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

बेंगळुरूतील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी स्फोट घडवून आणल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुख्य संशयिताला अटक केली आहे. १ मार्च रोजी झालेल्या या स्फोटात १० जण जखमी झाले होते. या आरोपीचे नाव मुझम्मिल शरीफ असे आहे. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकमधील १२, तमिळनाडूमधील पाच आणि उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी शोधमोहीम राबवून या मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे.

३ मार्च रोजी एनआयएने या स्फोटाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली होती. सुरुवातीला तपास संस्थेने स्फोट घडवून आणणाऱ्या मुख्य संशयित मुसाव्विर शाझीब हुसैनची ओळख पटवली होती. या स्फोटाचा कट रचणाऱ्या अब्दुल माथीन ताहा याचीही ओळख पटली होती. तो अन्य गुन्ह्यांतही पोलिसांना हवा आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, मुझम्मिल शरीफ याने आरोपींना आईडी स्फोटके बनवण्याचे साहित्य पुरवले होते.

एनआयएने १७ मार्च रोजी या तीन संशयितांच्या घरी तसेच, त्यांच्याशी संबधित दुकाने आणि घरांवर छापे टाकले होते. या दरम्यान तपास पथकाला डिजिटल उपकरणे आणि काही रोख रक्कम सापडली होती.

हे ही वाचा:

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

पवारांचे फासे उताणे पडतायत…

भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले

कॅफेमध्ये बॉम्ब ठेवलेल्या मुख्य संशयिताने टोपी आणि मास्क परिधान केला होता. त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ फुटेजही जाहीर करण्यात आले होते. या आरोपीची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version