27 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरक्राईमनामानोकरीसाठी तरुणांना थायलंडमध्ये नेले, छळ केला; मुंबईत दोघांना अटक

नोकरीसाठी तरुणांना थायलंडमध्ये नेले, छळ केला; मुंबईत दोघांना अटक

Google News Follow

Related

परदेशात नोकरीचे अमिष दाखवून भारतीय तरुणांची थायलंड देशात तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या दोन सदस्यांना मुंबई गुन्हे शाखेकडून परदेशात पळून जात असताना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांनी भारतातुन जवळपास २५ तरुणांना थायलंड मध्ये मोठ्या पगाराचे आमिष दाखवून त्यांना परदेशात पाठवले आहे. परदेशात या तरुणांचा छळ करून त्यांना सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जेरी फिलीप्स जेकब ( ४६) आणि गॉडफ्री थॉमस अल्वारेस (३९ ) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचा एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट मध्ये सहभाग होता. या रॅकेटच्या तावडीतून नुकताच सुटका होऊन भारतात परतलेल्या सिद्धार्थ यादव याने नुकतीच विलेपार्ले पोलीस ठाण्यात या टोळीच्या फसवणुकी बाबत तक्रार दाखल केली होती.

ठाण्यात राहणारा सिद्धार्थ यादव याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. २०२२ मध्ये तो नोकरीच्या शोधात होता, त्याने विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका शेफकडे नोकरीसाठी शब्द टाकला होता. या शेफने त्याच हॉटेल मध्ये काम करणाऱ्या रोहित नावाच्या व्यक्तीला सिद्धार्थ चा मोबाईल क्रमांक देऊन नोकरीसाठी सांगितले होते.

रोहितने सिद्धार्थला कॉल करून माझ्या ओळखीचा एक एजंट असून तो परदेशात तरुणांना नोकरीसाठी पाठवतो असे सांगितले. परदेशात कॉल सेंटरमध्ये मोठ्या पगाराची नोकरी असून तुझी तयारी असेल तर कळव, असे रोहित सिद्धार्थला म्हणाला. सिद्धार्थ हा थायलंडमध्ये नोकरी करण्यासाठी तयार झाल्यानंतर रोहितने जेरी जेकब नावाच्या एजंटला भेट करून दिली.

जेरी जेकब याने ५० हजार रुपये खर्च येईल असे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले, व रोहितने नोकरीचे ऑफर लेटर सिद्धार्थला पाठवले व दुसऱ्या दिवशी मुंबई ते बँकॉक व बँकॉक ते थायलंड असे विमानाचे तिकीट पाठवले. ३० डिसेंबर २०२२रोजी सिद्धार्थ बँकॉकला रवाना झाला, त्या ठिकाणी त्याला पुणे आणि इतर शहरातून आलेले काही तरुण तरुणी भेटल्या त्यांना देखील नोकरीसाठी पाठवण्यात आले होते.

थायलंड येथे गेल्यावर एका चायनीज व्यक्तीने सर्वांचे पासपोर्ट जमा करून बोटीने त्यांना लाओस देशात आणण्यात आले. या ठिकाणी जवळपास २५ भारतीयांना एका कॉल सेंटर मध्ये नोकरीला ठेवले. या कॉल सेंटरमधून लोकांची फसवणूक आणि सायबर गुन्हेगारी बेकायदेशीर कामे करण्यास सर्व भारतीय तरुणांना भाग पाडले. त्यानंतर या ठिकाणी सर्व भारतीय तरुणाचा छळ सुरू करण्यात येत होता.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकर न पाहिलेला बरा…

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

या कॉल सेंटर मधून बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे युरोप, अमेरिका आणि कॅनडामधील लोकांची फसवणूक केली जात होती. कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या भारतीयांना क्षुल्लक चुका आणि कारणांमुळे मोठा दंड ठोठावून त्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करून तुटपुंजा पगार दिला जात होता असे यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. पासपोर्ट जमा केल्यामुळे येथून बाहेर पडणे भारतीयांना कठीण होऊन बसले होते, अखेर या छळाला कंटाळून काही भारतीयांनी लाओसमधील भारतीय दूतावासाला मेल करून तक्रार दाखल केली. तक्रार केली म्हणून या तिघांना तेथील चिन्यांनी मारहाण देखील केली व तक्रार मागे घेण्यास दबाव टाकत होते.

अखेर भारतीय दूतावासाने येथून चार जणांची कशीबशी सुटका करून त्यांना भारतात पाठवले सिद्धार्थने भारतात आल्यानंतर प्रथम विलेपार्ले पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मुंबई गुन्हे शाखा कक्षा ८ चे प्रपोनि. लक्ष्मीकांत साळुंखे यांनी आपल्या पथकासह जेरी जेकब, गॉडफ्री थॉमस अल्वारेस यांचा शोध घेऊन त्यांना भारतातून परदेशात पळून जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. या टोळीवर विलेपार्ले पोलीस ठाणे येथे कलम ४२०, ३७०, ३२३, ३४२, ३४६, ३४७, ३८६, ५०४, ५०६, ३४, १२० (ब) भा.द.वि. सं सह कलम १०, २४ इमीग्रेशन ऍक्ट १९८३ हा गुन्हा गु.अ.वि., गु.प्र.शा. गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ८ करीत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
203,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा