गुजरात समुद्र किनारी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने पकडल्याची माहिती समोर आली आहे. ३ हजार ३०० किलो वजनाचे हजारो कोटींचे हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं अशी ही संयुक्त कारवाई केली आहे.
एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या पोरबंदर इथं एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे. भारतीय विमान P8I LRMR च्या इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलानं तस्करीत गुंतलेल्या संशयास्पद जहाजाला थांबवलं. कारवाई दरम्यान पकडलेल्या बोटी आणि चालक दलासह जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज हे भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.
कारवाई दरम्यान, एका जहाजातून गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात येत असलेलं ३ हजार ३०० किलो पेक्षा जास्त ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जहाजावरील क्रू मेम्बर्सला अटक करण्यात आली आहे. हे मेम्बर्स इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे.
In a successful coordinated operation at sea, Indian Navy in coordination with the Narcotics Control Bureau apprehended a suspicious dhow carrying almost 3300 Kg contraband (3089 Kg Charas, 158 Kgs Methamphetamine 25 Kg Morphine). Based on the input of P8I LRMR aircraft on… pic.twitter.com/h9vKc90554
— ANI (@ANI) February 28, 2024
हे ही वाचा:
ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स!
संदेशखाली गाव जमिनी हडपणे, अनन्वित छळाच्या घटनांचे साक्षीदार
अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!
ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?
कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३ हजार ८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. एका कंटेनरमधून सुमारे ३ हजार ३०० किलोहून अधिक वजनाचा हा ड्रग्जचा साठा समुद्रमार्गे नेण्यात येत होता. तेव्हा सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.