29 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामा‘आप’ माजी जिल्हाध्यक्ष महमूद खानला बलात्कार, धर्मांतरण प्रकरणी अटक

‘आप’ माजी जिल्हाध्यक्ष महमूद खानला बलात्कार, धर्मांतरण प्रकरणी अटक

हिंदू तरुणीने केले आरोप

Google News Follow

Related

आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांचा गृह जिल्हा असलेल्या सुलतानपूरमध्ये आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपचे माजी जिल्हाध्यक्ष महमूद खान यांना लव्ह जिहाद प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जयसिंगपूर कोतवाली भागातील एका हिंदू तरुणीने महमूद खान याच्यावर बलात्कार, धर्मांतरणासाठी दबाव टाकत ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, महमूद खानने मैत्रीच्या बहाण्याने तिला जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. जेव्हा महिलेने धर्मांतराला विरोध केला तेव्हा महमूदने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या महिलेने अखेर हिंदू संघटनांकडे मदत मागितली आणि त्यांना सोबत घेऊन शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

माहितीनुसार, महमूद खान याने सोनू असल्याचे सांगत तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर तरुणीला मैत्रीच्या जाळ्यात ओढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ऑगस्ट महिन्यात पीडिता खानच्या कार्यालयामध्ये त्याला भेटण्यासाठी आली. त्या ठिकाणाहून पीडितेला आरोपीने शहरातील एका खोलीमध्ये नेण्यात आले. त्यावेळी महमूदने पीडितेवर बलात्कार केला, तसेच व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेला धर्मांतरासाठीही दबाल टाकण्यात आला. दरम्यान तरुणीने घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून मेहमूदने पीडितेला जबरदस्ती मांस खाण्यास भाग पाडल्याचे ही सांगितले.

हे ही वाचा..

सलमान खान आता राहणार बुलेटप्रूफ काचेत

पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महमूद खानविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महमूद खान याने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांना राजकारणाचे बळी बनवले जात असल्याचे महमूद खान याने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा