वरळी अंधेरीतून ३७ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

वरळी अंधेरीतून ३७ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

वरळी आणि अंधेरी येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेले मद्य दिल्ली येथून महाराष्ट्रात ड्युटी बुडवून आणण्यात आले होते अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्यमध्ये मोठ्या प्रमाणात स्कॉच, आणि व्हिस्की मिळून आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या आचारसहिंतेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथके सतर्क झाली आहे. राज्यात होणारी मद्याची चोरटी वाहतूक,तसेच बनावट मद्य विक्री व बेकायदेशीर वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई सुरू करण्यात येत आहे. या कारवाईचा भाग म्हणून सोमवारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ कडून वरळी येथे मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले आहे.
या वाहनातुन भरारी पथकाने वेगवेगळ्या ब्रँडचे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

श्री ४२० तिहारमध्ये रामलीला मैदानावरील कीर्तन अगदीच वाया…

अमली पदार्थासह एकाला माहीम मधून अटक, ५४ लाखाचे ब्राऊन शुगर जप्त

आयपीएल टी २० चे बनावट तिकिटांची विक्री

कचथीवू बेटप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फटकारले

याप्रकरणी सतीश पटेल (३७) याला अटक करण्यात आली असून हे मद्य दिल्ली येथून राज्य सरकारचे महसूल बुडवून चोरट्या मार्गाने आणण्यात आले होते, व येथून हे मद्य अंधेरी येथे नेण्यात येणार होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान भरारी पथकाने अंधेरी येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा मिळून आला आहे. भरारी पथकाने जप्त करण्यात आलेला मद्याची किंमत ३७ लाख रुपये असून हे मद्य ड्युटी बुडवून राज्यात आणून त्याची विक्री केली जात होती.

Exit mobile version