धक्कादायक! शरद मोहोळच्या हत्येची वकिलांना होती माहिती

धक्कादायक! शरद मोहोळच्या हत्येची वकिलांना होती माहिती

कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. शरद मोहोळच्या हत्येच्या कटात दोन वकीलांचा सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येपूर्वी आरोपींची वकिलांबरोबर मीटिंग झाली होती. शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. दोन्ही आरोपी वकिलांना हत्येची माहिती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर हत्या करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले आहे.

शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. त्यापैकी एक वकील ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा:

गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!

अजित पवार जाणार अयोध्येला, निमंत्रण मिळाले!

कॉंग्रेसने राम मंदिर निमंत्रण नाकारून पापक्षालनाची संधी गमावली

मेहबुबा मुफ्तींच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावल्या!

गुन्ह्यातील आरोपींनी ऑक्टोबरमध्ये १ ते ६ तारखेदरम्यान मोहोळ याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यासाठी आरोपीबरोबर दोन्ही वकिलांनी पिरंगुट येथे बैठक घेतली होती. आरोपी नेमके कुठे भेटले? त्यांच्यासोबत आणखी काहींचा यात समावेश आहे का? या गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण आहे? याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी केली. दोन्ही आरोपी वकिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर नव्याने अटक केलेल्या दोन आरोपींची सात दिवस कोठडीत रवानगी केली.

Exit mobile version