25 C
Mumbai
Friday, November 22, 2024

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हर फ्लो!

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगला. आज दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

यापूर्वी दिनांक २० जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. आज त्यापाठोपाठ तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी आतापर्यंत २ तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून आज सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५८.५८ टक्के इतका जलसाठा आहे.

हेही वाचा..

इस्लामिक सेंटर हॅम्बर्गवर जर्मनीने घातली बंदी !

कारच्या बॉनेटवर बसला होता ‘स्पायडरमॅन’, पोलिसांनी जाळे टाकून केली कारवाई !

दुर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ !

वेळ पडल्यास अनिल देशमुखांचे ऑडीओ व्हिजुअल्स जाहीर करणार

आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी दिनांक २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये दिनांक १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा