शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…

शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…

पेटीएमनंतर आता झोमॅटोवर ही विक्रीचा प्रचंड दबाव आहे. आज झोमॅटोचे शेअर १९ टक्क्यांनी घसरून ९२.२५ रुपयावर पोहचले आहेत. झोमॅटोची जुलै २०२१ पासून बंपर लिस्टमध्ये प्रवेश झाल्यापासून पहिल्यांदा शंभर रुपयाच्या खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे २६ हजार कोटीचे नुकसान झाले आहे.

तसेच काही फायदेशीर इंटरनेट कंपन्यांपैकी एक असलेल्या नायकाचे ट्रेडिंग पहिल्या सत्राच्या पहिल्या तासात शेअरच्या किंमती दहा टक्क्यांहून अधिक घसरल्याने विक्रीचा दबाव आहे. नायका २ हजार २०६ लिस्टिंग किंमतीहून घसरून १ हजार ७७१ वर पोहचला आहे.

दोन दिवसापूर्वी झोमॅटो ९ टक्क्यांहून अधिक घसरला होता. झोमॅटोचे बीएसईमध्ये मार्केट कॅपही घसरून ७४ करोडवर आले आहे. लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी त्याचे मार्केट कॅप एक लाख करोडवर पोहचले होते. त्यामुळे झोमॅटोने शेअर बाजारात बंपर पदार्पण केले आणि एनएसईतील जारी किमतीच्या तुलनेत ११६ वर पोहचला.

हे ही वाचा:

‘२५ वर्षे युतीत सडले म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का?’

तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’

‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

 

झोमॅटोमध्ये जी घसरण होत आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तो सूचिबद्ध किमतीपासून खाली घसरला हे एका कंपनीसाठी चांगले लक्षण नाही. अनेक नवीन कंपन्या बाजारातील उत्साहादरम्यान अवास्तव मूल्यांकनांसह बाहेर आल्या परंतु, आम्हाला माहिती आहे की, केवळ काही कंपन्या दीर्घकाळ टिकतील. मला विश्वास आहे की, झोमॅटोमध्ये दीर्घकालीन कामगिरी करण्याची क्षमता आहे. असे स्वास्तीका इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले.

सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या पेटीएमने बाजारात ४ टक्क्यांनी घसरण करून ८९२ वर आहे. पेटीएमच्या इश्यू किमतीच्या तुलनेत सुमारे ६० टक्क्यांनी त्याची घसरण झाली आहे.

Exit mobile version