पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती

राजकीय अस्थिरता यामुळे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात अडकू शकतो

पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती

कोरूना मुळे जीएसटी तो मिळणाऱ्या महसुलात मोठी तूट निर्माण होईल असा तज्ज्ञांचा अंदाज दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.5 टक्क्याने आकुंचन पावला

पाकिस्तानच्या जीडीपी वाढीत ०.४ टक्क्यांची मोठी घसरण होण्याचा अंदाज जागतिक बँकेला व्यक्त केला आहे. पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो असा इशाराही जागतिक बँकेने दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रम पूर्ण न होणे, प्रमुख द्विपक्षीय भागीदारांकडून निधी मिळवण्यात अपयश आणि राजकीय अस्थिरता यामुळे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात अडकू शकतो असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

देशाचा दृष्टीकोन मुख्य नकारात्मक जोखमींच्या अधीन आहे, जर ते प्रत्यक्षात आले तर, एक व्यापक आर्थिक संकट ओढवू शकते.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रम पूर्ण न होणे, पुनर्वित्त आणि नवीन वित्तपुरवठा सुरक्षित करण्यात अयशस्वी होणे यामुळे हा धोका वाढतो असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पाकिस्तानचा जीडीपी ०.६ टक्के इतका कमी राहण्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने एका वेगळ्या अहवालात म्हटले आहे पाकिस्तानात महागाईचा दर २७. ५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा आणि परकीय चलनाचे संकटाचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याची विरोधकांची याचिका न्यायालयाने ठरविली ‘फडतूस’

मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

रॅप गाण्यातून मुख्यमंत्र्यांवर बदनामीकारक शब्दप्रयोग करणाऱ्यावर गुन्हा

पाकिस्तानमध्ये निम्न मध्यम-उत्पन्न दारिद्र्यरेषेवर मोजली जाणारी गरिबी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३६.२ टक्क्यांवरून वाढून २०२३ मध्ये ३७.२ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत अतिरिक्त ३.९ दशलक्ष लोकांना गरिबीच्या खाईत ढकलले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील गरिबीत एक टक्का वाढ झाल्यामुळे सुमारे ४० लाख लोक दारिद्र्यरेषेखाली आले आहेत.

Exit mobile version