विप्रोचे बँकिंग क्षेत्रात पदार्पण

विप्रोचे बँकिंग क्षेत्रात पदार्पण

भारतातील दिग्गज आयटी कंपनी विप्रोने ब्रिटनस्थित बॅंकिंग आणि फायनॅन्शिएल सर्व्हिस सेक्टरची सेवा देणारी कंपनी कॅपको ची खरेदी तब्बल १०५ अब्ज रुपयांना केली आहे. विप्रोने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.

बॅंकिंग आणि फायनॅन्शिएल सर्व्हिस सेक्टरमध्ये येत्या काळात विप्रो भक्कमपणे पावले टाकेल असेही कंपनीच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यामुळे कॅपकोच्या खरेदीमुळे या क्षेत्रातील नवीन ग्राहकांना कंपनी आकर्षित करेल असा आत्मविश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

कॅपको या ब्रिटिश कंपनीच्या ३० शाखा असून त्यामध्ये पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. विप्रोचा आणि कॅपकोचा हा संपूर्ण व्यवहार कॅशच्या स्वरुपात होणार आहे. ३० जून २०२१ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांना परवानगी

विप्रोकडून करण्यात आलेला हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. कॅपकोचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरमध्ये जगभरातील कंपन्यांना सेवा पुरवण्यात येतात.

गेल्या वर्षी शेवटच्या तिमाहीतील विप्रोच्या नफ्यात २०.८ टक्क्यांची भर पडली होती. या कंपनीचा शेवटच्या तिमाहीतील एकूण फायदा हा २९६७ कोटी रुपये इतका होता. याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नात १.३ टक्क्यांची वाढ झाली असून ती १५,६७० रुपयांवर पोहोचली आहे.

Exit mobile version