23 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरअर्थजगतआजच अर्थसंकल्प का जाहीर करतात .. जाणून घ्या

आजच अर्थसंकल्प का जाहीर करतात .. जाणून घ्या

जाणून घेऊया अर्थसंकल्पाचा इतिहास

Google News Follow

Related

एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या देशाचा २०२३ -२४ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  पूर्ण देशाचे लक्ष  अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कोणाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण आपल्याला हे माहित आहे का , गेल्या काही वर्षांपासून एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प का सादर करतात . तसेच अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ देखील सकाळी ११ वाजता का निश्चित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या या वेळेबाबतचा खूप मोठा रंजक इतिहास आहे. त्याआधी हे पण महत्वाचे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दोन प्रमुख बदल अर्थसंकल्प सादर करताना झाले. पूर्वी आपल्याकडे अर्थसंकल्प सादर करताना ब्रिटिश पद्धत चालू होती पण नंतर ती बदलण्यात अली.

इतिहास अर्थसंकल्पाचा
भारतात सात एप्रिल १८६० साली पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. १९२४ पासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आराम मिळावा म्हणून ही वेळ निश्चित केल्याचे सांगितले जाते. ब्रिटनमध्ये प्रथम सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर व्हायचा. त्यानंतर भारतात संध्याकाळी अर्थसंकल्प सादर केला जायचा. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे आधी ब्रिटनचा अर्थसंकल्प व्हायचा आणि त्यानंतर .संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे अर्थसंकल्प सादर करत असत . १९९९ पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या तारखेला अर्थसंकल्प सादर केला जात होता.

ब्रिटिश भारतातून गेले तरीही त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेनुसारच प्रशासन अर्थसंकल्प सादर करत होते.
पण स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी. १९९९ साली यशवंत सिन्हा यांनी संध्याकाळी अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडण्याची एक नवी परंपरा सुरु केली. त्यानंतर हीच परंपरा भारतात दरवर्षी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची चालू आहे.

“अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना मुलाखती देण्यासाठी किंवा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खूप वेळ लागतो संध्याकाळी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या मुलाखती रात्रीपर्यंत चालायच्या. त्यामुळे वेळ बदलणे गरजेचे होते. या अडचणी लक्षात घेऊन वाजपेयी सरकारने जशी वेळेत बदल केला त्याप्रमाणे मोदी सरकारने अर्थ संकल्पाच्या तारखेत बदल केला.

अरुण जेटलींच्या काळात बदलली तारीख
२०१७ साली तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरीस सादर न करता तो १ फेब्रूवारी रोजी सादर करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सलग १ फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर केला जात आहे. फेब्रुवारीच्या अखेरची तारीख अर्थसंकल्प सादर करण्याची होती ,ती बदलून तारीख बदलण्याचे प्रमुख कारण म्हणजे कर रचनेतील बदल अमलात आणण्यासाठी आणि सामान्य वर्गाला ते समजून घेण्यासाठी केवळ एकच महिना मिळायचा.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

निर्मला सीतारामन सादर करणार पाचवा अर्थसंकल्प
भारतात व्यवहारासाठी आर्थिक वर्ष एक एप्रिल ते ३१ मार्च असे धरले जाते. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्याच तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचे ठरविले गेले. तसेच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेत देखील विरोधी पक्षांना त्यावर पुरेशी चर्चा करता येते. म्हणून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.  यावर्षीच्या अर्थसंकल्प विशेष म्हणजे सलग पाचव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा