…म्हणून सेन्सेक्स कोसळला

…म्हणून सेन्सेक्स कोसळला

पाश्चिमात्य जगात पसरत चाललेला साथीचा आजार आणि जागतिक बाजारातील कमजोरी यामुळे सोमवारी भारतीय शेअर्स आणखी घसरले. विक्रमी उच्चांकावरून दहा टक्क्यांनी मार्केट खाली आले आहे. विश्लेषकांच्या मते, ‘वाढती महागाई, मध्यवर्ती बँकाची होणारी घसरण ,ओमिक्रॉन या नवीन प्रकारचा संसर्ग त्याशिवाय, एफआयआयची होणारी सततची विक्री आणि विकसित अर्थव्यवस्थांमधील वाढीचा वेग मंदावत आहे. या सर्व गोष्टी एकत्रितपणे बाजारपेठेत खळबळ उडवून देत असल्याकारणाने शेअर मार्केट घसरत आहे.’

इक्विटी गुंतवणूकदारांना सुमारे ९.३७ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला, कारण त्यांची संपत्ती बीएससी लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये २४९.९१ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरली. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही के विजयकुमार म्हणाले, “ही घसरण फार काळ टिकणार नाही. जेव्हा मूल्यांकन आकर्षक होईल तेव्हा एफआयआय लवकरच खरेदीदार बनतील. तसेच किरकोळ गुंतवणूकदार उच्च दर्जाचे शेअर्स, विशेषत: वित्तीय, ज्यांचे मूल्यांकन आकर्षक झाले आहे, खरेदी करण्यासाठी सुधारणांचा वापर करू शकतात.”

हे ही वाचा:

देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण

धक्कदायक! पती बरा व्हावा म्हणून सहा महिन्याच्या नातीचा दिला बळी

तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त

हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा

शेअर बाजार आज उघडल्यानंतर, बेंचमार्क निर्देशांक आणखी खाली आले. दुपारी १२.५० वाजता, बीएसई प्रमुख सेन्सेक्स १ हजार ७१५ अंकांनी घसरून ५५ हजार २९६ वर आला. तर, एनएससी बेंचमार्क निफ्टी ५३० अंकांनी घसरून १६ हजार ४५६ वर आला. जेएसडब्लू स्टील या पॅकमध्ये सर्वाधिक ४.०८ टक्क्यांनी घसरला. टाटा स्टील, बजाज फायनान्स, एम अँड एम, एसबीआय, टाटा मोटर्स, बीपीसीएल, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि ग्रासिम इंडस्ट्रीज हे इतर समभाग लाल रंगात व्यवहार करत आहेत.

Exit mobile version