किरकोळ पाठोपाठ आता घाऊक महागाईने देखील दिलासा दिला आहे. देशातील घाऊक महागाई ऑक्टोबरमधील ८.३९ टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये ५.८५ टक्क्यांवर आली आहे. घाऊक महागाईचा हा २१ महिन्यातील नीचांक आहे . देशातील घाऊक महागाईत सातत्याने घट होत असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य महागाई ऑक्टोबरमधील ८. ३३ टक्क्यांवरून ७.०३ टक्कत्यांवर आली आहे भाजीपाला, बटाटे, कांदे, फळे आणि दुधाच्या किमती कमी झाल्यामुळे मासिक आधारावर महागाईत घट झाली आहे.किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईची झळही कमी झंझाली आहे.
सरकार आणि रिझर्व बँकेच्या सततच्या प्रयत्नांमुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये महागाई ५.८८ टक्क्यांवर आली आहे. अनुकूल आधारभूत परिणामामुळे ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक झपाट्याने घसरून ६.७७ टक्क्यांवर आली. सलग १० महिने महागाई ६ टक्क्यांच्या वर राहिली.
हे ही वाचा:
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले
ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या किमती १७. ६१ टक्क्यांनी घसरल्या आहेत. सप्टेंबरमध्ये या किंमती ३९.६६ टक्क्यांनी घटल्या. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढून १२.०३ टक्के झाल्या. याच कालावधीत तांदूळ ५.७९ टक्क्यांवरून ६.६३ टक्के आणि गहू १६. ०९ टक्क्यांवरून १६. २५ टक्क्यांवर पोहोचला. अंडी, मांस आणि मासे यांची विक्री एका महिन्यापूर्वी ३.६३ टक्क्यांवरून ३.९७ टक्क्यांवर पोहोचली आहे.