31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरअर्थजगतशेअर बाजारात तेजी; पण सोने पडले फिके

शेअर बाजारात तेजी; पण सोने पडले फिके

Google News Follow

Related

देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर या काळात चांदी ५१५ रुपयांनी स्वस्त झाली. रुपयाच्या मजबुतीदरम्यान भारतीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव ०.०८ टक्क्यांनी घसरला. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत कमजोरी दिसून आली. त्याचबरोबर सप्टेंबर फ्युचर्स चांदीच्या किमतीत उसळी पाहायला मिळाली. व्यापारादरम्यान ते ०.१३ टक्के वाढले.

मंगळवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जवळजवळ १२ आठवड्याच्या उच्चांकावर ७३ पैशांवर बंद झाला. भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये १०.७५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी समाविष्ट आहे. रुपया मजबूत झाल्याने मौल्यवान धातूची आयात स्वस्त झाली.

एमसीएक्सवर ऑक्टोबर वायदा सोन्याचे भाव ३६ रुपयांनी कमी होऊन ४७,०८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. डॉलरच्या निर्देशांकातील अत्यंत अस्थिरतेदरम्यान मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीने अस्थिरता दर्शविली. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे संमिश्र भाव होते. अमेरिकेत नोकरीच्या प्रमुख अहवालापूर्वी जागतिक बाजारात सोन्याचे भाव स्थिर होते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, फेडरल रिझर्व्ह त्याच्या उत्तेजक उपाय सुलभ करण्यास सुरुवात करू शकते. सप्टेंबर वायदा चांदीचे भाव ८३ रुपयांनी वाढून ६२,९९९ रुपये प्रति किलो झाले.

हे ही वाचा:

३५० तालिबान्यांचा खात्मा

मंदिरे खुली करू नका, असे केंद्राने कुठे सांगितले?

ठाकरे सरकारने महाराष्ट्राला बंदीवान केलं

भुजबळ परवेजला राहण्याचं भाडं देतात का?

मंगळवारी रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने १०० रुपयांनी घसरून ४६,२७२ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. यामुळे सोने मागील व्यापार सत्रात ४६,३७२ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. चांदी १३४ रुपयांनी घटून ६२,६३९ रुपये प्रति किलो झाली. मागील ट्रेडिंग सत्रात चांदी ६२,७७३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा