पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

सोमवार, २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-रुपी या नव्या सेवेचे लोकार्पण केले. गेल्या काही वर्षात भारतात आलेल्या डिजिटल क्रांती मधील हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेले हे नवीन ई-रुपी आहे तरी काय? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे

ई-रुपी हे आर्थिक व्यवहारांचे एक कॉन्टॅक्टलेस माध्यम असणार आहे. या माध्यमात कोणत्याही प्रकारच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची गरज लागणार नाही. तर त्यासोबतच इंटरनेट बँकिंग किंवा युपीआयचीही आवश्यकता भासणार नाही. भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ही सेवा विकसित केली आहे. ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शी असणार आहे. तर त्याच वेळेला अतिशय वेगाने काम करणारी ही सुविधा असेल

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री भेटले नाहीत तर ‘मातोश्री’ समोर आत्मदहन

आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

‘कोनशिलेवर मुख्यमंत्र्यांचे नाव, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का नाही?’

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

वास्तवात ई-रुपी हे एक प्रीपेड ऑनलाइन वाऊचर आहे. एसएमएस अथवा क्यू आर कोड च्या माध्यमातून या वाऊचरचा वापर होणार आहे. सरकार एखाद्या विशिष्ट योजनेसाठी विशिष्ट वाऊचर देऊ शकते जे एका निश्चित कालावधी पर्यंत काम करेल. उदाहरणार्थ सरकार कडून एखाद्या आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत देताना ती ई-रुपी वाऊचरच्या स्वरूपात दिली जाऊ शकते जी मदत फक्त त्यांनाच पोहोचेल जे त्याचे खरे लाभार्थी असतील. याचा उपयोग हे नागरिक गिफ्ट कार्ड सारखा करून ते रिडीम करू शकतात.

या सेवेच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज देश डिजिटल गव्हर्नन्सला एक नवा आयाम देत आहे. देशातील डिजिटल ट्रान्झॅक्शनला अधिक प्रभावी करण्यामध्ये ई-रुपी वाऊचर महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. यामुळे टारगेट ऍड ट्रान्सपरंट आणि लिकेज फ्री डिलिव्हरी देताना सर्वांनाच मदत होईल.

Exit mobile version