30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगत२००० च्या नोटांचे काय झाले? वाचा आरबीआयचे स्पष्टीकरण

२००० च्या नोटांचे काय झाले? वाचा आरबीआयचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

२००० रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. खरं तर २००० रुपयांच्या नोटांचा नवीन पुरवठा होणार नसल्याचं २६ मे रोजी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर लाँच करण्यात आलेल्या या नोटांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या नोटा आता हळूहळू चलनातील पुरवठ्यातून कमी होत आहेत. त्याचबरोबर या नोटा यापुढे नव्याने येणार नाहीत, या आधीपासूनच ठरलेलं आहे, असं आरबीआयने यापूर्वीच २००० रुपयांच्या नोटाविषयी सांगितले होते.

आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षापर्यंत २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा झालेला नाही. रिझर्व्ह बँकेने अखेर २०१८-१९ मध्ये ४६७ लाख २००० रुपयांच्या नोटांचा पुरवठा केला होता. अशा प्रकारे एकूण २००० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटांचा वाटा ८७.५ टक्के आहे.

एटीएममधून २००० रुपयांच्या नोटा काढून टाकल्यापासून २००० रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत की काय, अशी अटकळ बांधली जात होती. कारण आता सरकारने २००० रुपयांच्या नवीन नोटा छापणार नसल्याचेही सांगितले आहे. मार्च महिन्यात अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली होती. गेल्या दोन वर्षांत २००० च्या नोटा छापल्या गेल्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं होतं.

सरकारी आकडेवारीनुसार, ३० मार्च २०१८ पर्यंत ३ अब्ज ३६ कोटी २० लाखांच्या नोटा चलनात आल्या. तर २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत फक्त २ कोटी ४९ कोटी ९० लाख २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. त्याच वेळी २०१९-२० आणि २०२०-२१ दरम्यान २००० रुपयांच्या बँक नोटांच्या छपाईशी संबंधित कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. याचा अर्थ या नोटांचे मुद्रण २०१९-२० पासून थांबले आहे.

हे ही वाचा:

आयएमए अधिकारी धर्मपरिवर्तनात मग्न

कसोटी अजिंक्यपद लढत अनिर्णीत किंवा बरोबरीत सुटल्यास काय होणार?

ग्लोबल टेंडरकडून निराशेनंतर ‘या’ सहा शहरांना विनंती

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, बँकेच्या एटीएममधील नोटांच्या कॅसेटमधून २००० रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढून टाकल्यात. २००० च्या नोटांच्या कॅसेटची जागा १०० रुपये आणि २०० रुपयांच्या कॅसेटने घेतली आहे. हेच कारण आहे की, बहुतेक एटीएममध्ये २००० रुपयांच्या नोटा नसतात. काळ्या पैशाला पुन्हा एकदा वाढेल, या उद्देशानंच सरकारने २००० रुपयांच्या नवीन नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा