‘वारी एनर्जी म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भर!’

उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी केले कौतुक; वारी एनर्जीच्या शेअरने घेतली दमदार झेप

‘वारी एनर्जी म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भर!’

वारी एनर्जीचा समभाग सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये २५५० रुपयांवर उघडला. त्यामुळे या समभागाच्या १५०३ रु. या मूळ किमतीवर ६९.७ टक्के इतकी भरघोस वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. हा शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी १५०३ रु. दराने खुला करण्यात आला होता. त्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यांनी या शेअरवर विश्वास व्यक्त केला होता. सोमवारी जेव्हा तो उघडला तेव्हा त्याने दमदार झेप घेतली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ केला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही हा समभाग २५०० रुपयांवर उघडला. प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी वारी एनर्जीच्या या भरारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘वारी उद्योगसमुहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हितेशभाई दोशी यांचे खूप खूप अभिनंदन. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जी भरारी वारी एनर्जीच्या शेअर्सनी घेतली आहे त्यामुळे वारी उद्योगसमूह हा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भरटाकणारा हमखास यशाचा मार्ग म्हणून पाहता येईल.’

कंपनीच्या या आयपीओने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ४३२१ कोटींच्या या आयपीओला मिळालेला प्रतिसाद दणदणीत होता. जवळपास ९७.३४ लाख अर्ज या आयपीओसाठी केले गेले. भारतातील शेअर बाजाराच्या इतिहासात एखाद्या आयपीओने केलेली ही सर्वोच्च कामगिरी म्हणता येईल.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड

माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वारी एनर्जीच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा विचार करता प्रदीर्घ काळ या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना लाभ मिळत राहतील. दीर्घकाळ हे समभाग ठेवले तर गुंतवणूकदारांच्या पदरी चांगला लाभ पडेल. पुनर्नविकरणीय ऊर्जेच्या बाबतीत वारी एनर्जीच्या क्षमता लक्षात घेता गुंतवणूकदारांना भविष्यात यातून चांगला फायदा मिळू शकेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वारी समुहाच्या वारी टेक्नॉलॉजीस आणि वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीस या शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. त्यावर गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखविलेला आहे. त्यानंतर आता आलेल्या वारी एनर्जी या शेअरनेही गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळविला आहे.

 

 

Exit mobile version