पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोलम जातीच्या भाताची लागवड गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. ‘वाडा कोलम’ या तांदळाला त्याच्या चवीमुळे आणि विविध गुणांमुळे राज्यातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. ‘वाडा कोलम’ ला अखेर कित्येक वर्षांच्या पाठपुराव्यांनंतर या वाणाला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
‘वाडा कोलम’ हा अत्यंत सुगंधी, मुलायम, चवीला अत्यंत रुचकर आणि पचनाला हलका असल्याने या तांदळाला मोठी मागणी आहे. या भाताचे उत्पन्न तुलनेने कमी असल्यामुळे नफेखोरांनी ‘वाडा कोलम’ या नावाने बनावट तांदूळ बाजारात आणून ग्राहकांची फसवणूक सुरू केली आहे. मात्र आता भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे तांदळाची मुख्य चव टिकून राहणार आहे.
हे ही वाचा:
दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!
“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी
राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू
योगींनी कंगनाला दिली खास भेट! भेट पाहून कंगना म्हणाली…
पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. येथील वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी येथील वाडा उत्पादक शेतकरी संस्था गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होती. अखेर बुधवारी (२९ सप्टेंबर) केंद्राकडून तत्वतः मानांकन देण्यासाठी मौखिक स्वीकृती देण्यात आली आहे.
‘वाडा कोलम’च्या नावाने दुय्यम दर्जाचा तांदूळ विकला जात असल्याने वाडा येथील तांदळाचे उत्पन्न कमी झाले होते. वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रा. गणेश हिंगमिरे यांनी चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी केंद्राकडे ‘वाडा कोलम’ला भौगोलिक मानांकन प्राप्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्टर कार्यालयात मानांकन मिळण्याच्या दृष्टीने पडताळणी करण्यात आली आणि तत्वतः मान्यता देण्यात आली.