चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी

चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी

व्हीएलसी मिडियावर भारत सरकारने बंदी घातली आहे. चीनमधील सिकाडा नावाच्या हॅकर गटाने चीन सरकारच्या पाठिंब्याने सायबर हल्ला मोहिमेचा भाग म्हणून सिस्टममध्ये मालवेअर वितरीत करण्यासाठी व्हीएलसी मिडियाचा चा वापर केला होता असा दावा एप्रिल २०२२ मध्ये, सायबरसुरक्षा तज्ञांनी केला होता. त्यामुळे या अ‍ॅपवर सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात व्हीएलसी वेबसाइटवर का बंदी घालण्यात आली याबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन- आयडीया या  सर्व आयएसपी आणि इतर भारतातील वापरकर्त्यांना व्हीएलसी वेबसाइट ऍक्सेस करण्याची परवानगी देत नाहीत

सध्या, देशात व्हीएलसी मीडिया प्लेयर वेबसाइट आणि डाउनलोड लिंक ब्लॉक आहेत. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा आहे की देशातील कोणीही कोणत्याही कामासाठी या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाही.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

newsया अ‍ॅपवरही आहे बंदी

अलीकडे, भारत सरकारने पबजी मोबाईल , टीकटॉक, कॅमस्कॅनर यांच्यासह शेकडो चिनी अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्यामागचे कारण म्हणजे सरकारला भीती होती की हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा डेटा चीनला पाठवत आहेत

Exit mobile version