विस्ताराचे टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये विलीनाकरण केले जाणार असल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने मंगळवारी सांगितले. सध्या चार विमान कंपन्या टाटा समूहाचा भाग आहेत. कुटुंबात आता एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअरएशिया इंडिया आणि विस्तारा यांचा समावेश आहे. टाटा समूहाने या वर्षी जानेवारीमध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते. विस्ताराने जानेवारी २०१५ मध्ये उड्डाण करण्यास सुरुवात केली.
एअरएशिया इंडिया २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती, तर एअर इंडिया एक्सप्रेस २००५ मध्ये सुरू झाली होती. इंडिगोनंतर देशांतर्गत बाजारपेठेत ९.२ टक्के हिस्सा असलेली विस्तारा ही ऑक्टोबरमध्ये दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी होती. इंडिगोचा बाजारातील हिस्सा ५६.७ टक्के होता.. विस्तारामध्ये टाटा समूहाचा५१ टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित ४९ टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. या व्यवहाराचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्स देखील एअर इंडियामध्ये २,०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
या करारामुळे सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडिया समूहातील २५.१ टक्के भागभांडवल मिळेल, असे सिंगापूर एअरलाइन्सने म्हटले आहे. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा यांचे मार्च २०२४ पर्यंत विलीनीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सिंगापूर एअरलाइन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन करून हा करार करण्यात आला आहे. टाटाची बाजारपेठेतील उपस्थिती पाहता हा करार दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
टाटा समूहाने म्हटले आहे की, विलीनीकरणा नंतर , एअर इंडिया २१८ विमानांच्या एकत्रित ताफ्यासह देशातील आघाडीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनी असेल. सध्या चार विमान कंपन्या टाटा समूहाचा भाग आहेत. कुटुंबात आता एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअरएशिया इंडिया आणि विस्तारा यांचा समावेश आहे. टाटा समूहाने या वर्षी जानेवारीमध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते.