रविवारपासून देशासह जगभरात चर्चा आहे ती टी- २० विश्वचषक स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अतितटीच्या सामन्याची. काल झालेल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार याची शाश्वती नव्हती. शेवटच्या चेंडू पर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याने भारतीयांच्या खरेदीला रोखल्याची मजेशीर आणि अजब माहिती समोर आली आहे.
रविवार, हा भारत- पाकिस्तान या सामन्यासाठी जरी राखीव असला तरी दिवाळीसाठीच्या खरेदीचा दिवस देखील होता. त्यामुळे रविवारी सकाळपासून लोकांनी खरेदीला सुरुवात केली होती. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे खरेदी सुरू होती. खरेदीचा जोर अगदी पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना दिसून येत होता. मात्र, दुसऱ्या डावात जेव्हा विराट कोहलीने त्याची उत्तम खेळी खेळायला सुरुवात केली तेव्हा जवळजवळ लोकांनी खरेदी करणं थांबवलं होतं.
UPI व्यवहाराच्या प्रमाणात सर्वात मोठी घट सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये दिसून आली जेव्हा विराट कोहली ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी खेळत होता. नंतर, सामना संपताच खरेदीची लगबग पुन्हा सुरू झाली.
हे ही वाचा:
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
मुंबई विकास महामंडळ; रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
मॅक्स लाइफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर व्होरा यांनी यासंबंधीचा एक ग्राफ ट्विट करत याची माहिती दिली आहे. “विराट कोहलीने भारतीयांना खरेदी करण्यापासून रोखलं होतं. काल सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत UPI व्यवहार- जसजसा सामना मनोरंजक बनला तसे ऑनलाइन खरेदी थांबली आणि सामन्यानंतर तीक्ष्ण वाढ झाली आहे,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
#ViratKohli stopped #India shopping yesterday!!
UPI transactions from 9 a.m. yesterday till evening – as the match became interesting, online shopping stopped – and sharp rebound after the match! #HappyDiwali #indiavspak #ViratKohli𓃵 #Pakistan pic.twitter.com/5yTHLCLScM
— Mihir Vora (@theMihirV) October 24, 2022