पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विजय शेखर शर्मा यांनी आज कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आधी आशीर्वाद घेण्यासाठी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला भेट दिली. Paytm चा IPO, पूर्वी One97 Communications म्हणून ओळखला जात होता, हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म जवळपास $२.५ अब्ज (अंदाजे ₹१८ हजार ५२७ कोटी) उभारण्याचा विचार करत आहे.
हे वर्ष याआधीच शेअरबाजारातील आयपीओसाठी विक्रमी वर्ष ठरले आहे. फूड डिलिव्हरी दिग्गज Zomato हा जुलैमध्ये $१.३ अब्ज (अंदाजे ₹ ९,६३४ कोटी) शेअर इश्यूसह आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता.
Just met Sh. Jawahar Reddy Executive Officer, Tirumala Tirupati Devasthanams (#TTD) in Tirupati as I have come here to seek blessing of God for all of @Paytm family. 🙏🏼🙏🏼🙏🏼 pic.twitter.com/i7RIep8sLk
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) November 8, 2021
पेटीएमला चिनी टायकून जॅक माचा अँट ग्रुप, जपानची सॉफ्टबँक आणि वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवेचा पाठिंबा आहे. हे तीन मिळून सुमारे एक तृतीयांश कंपनीचे मालक आहेत.
तिरुपती देवस्थान ट्रस्ट आंध्र प्रदेशातील तिरुमाला वेंकटेश्वर मंदिरासह इतर मंदिरांच्या व्यवहार आणि आर्थिक गोष्टींवर देखरेख करते. हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भेट दिलेले धार्मिक केंद्र आहे.
हे ही वाचा:
हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी
पंढरपूरला देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवू या!
मुख्यमंत्री बदलूनही सिद्धू विरुद्ध पंजाबचे मुख्यमंत्री मालिका सुरूच
दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान
Paytm IPO सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे आणि बुधवारी, १० नोव्हेंबर रोजी बंद होईल. इच्छुक गुंतवणूकदार सहा इक्विटी शेअर्स आणि त्या पटीत बोली लावू शकतात. अप्पर प्राइस बँडवर, गुंतवणूकदारांना सिंगल लॉट मिळवण्यासाठी ₹१२,९०० भरावे लागतील. किंमत बँड प्रति इक्विटी ₹२,०८० ते ₹२,१५० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
Paytm IPO मधून मिळणार्या परताव्याचा उपयोग “ग्राहक आणि व्यापारी यांचे संपादन करणे आणि त्यांना तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये अधिकाधिक प्रवेश प्रदान करणे” यासारख्या विविध गोष्टींसाठी करणार आहे.