देशभरातील कोरोना परिस्थितीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांच्या विक्रीत घट झाली होती. मात्र आता कोरोनाची लाट आटोक्यात येत असताना वाहन उद्योगाने मरगळ झटकायला सुरूवात केली आहे. आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, यांच्यासोबत मारुतीने देखील विक्रीत वृद्धी नोंदवली आहे.
अनेक महिन्यांनंतर देशातील वाहन उद्योग पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागला आहे. मारुती सुझुकी या लोकप्रिय कंपनीच्या विक्रीत जूनमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी लावलेल्या टाळेबंदीमुळे विक्रीतील तुलना वार्षिक ऐवजी मासिक केली जात आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा जेम्स बॉण्ड?
बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये
पटोलेंचा पत्रव्यवहार, मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस मंत्र्याचीच तक्रार
‘पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंगशी देशमुखांचा संबंध होता’
वाहन कंपन्यांनी गेल्या महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे स्वतंत्ररित्या जाहिर केले. या आकड्यांनुसार मारुतीने जूनमध्ये १.४७ लाख वाहने विकली. मासिक तुलनेत त्यात थेट २१७ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कंपनीने १७,२३७ वाहनांची निर्यात करण्यात आली.
महिंद्र कंपनीच्या बहुउपयोगी वाहनांच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे. कंपनीच्या ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीने या काळात एकूण ३२,९६४ वाहनांची विक्री केली. त्यात मासिक तुलनेत ८९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. त्याबरोबच टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत देखील ५९ टक्के वाढ झाली. टाटा मोटर्सने २४,११० वाहनांची विक्री केली.
या सोबतच ह्युंदई मोटर इंडियाच्या विक्रीत देखील वाढ झाली. या कंपनीच्या विक्रीत ७७ टक्क्यांची वाढ झाली. मूळ कोरियाच्या किआ इंडिया कंपनीने १५,०१५ वाहनांची विक्री केली. या मोठ्या कंपन्यांशिवाय इतर अनेक लहान-मोठ्या वाहन उत्पादकांच्या वाहन विक्रीत देखील मोठी वाढ झाली.