भारतीय बनावटीच्या सेमीकंडक्टरमुळे लॅपटॉपची किंमत १ लाख रुपयांवरून ४०,००० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते असं वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर तयार उत्पादनांच्या किमतीवर मोठा परिणाम करू शकतात. आज, एका लॅपटॉपची किंमत १ लाख रुपये आहे, आणि ग्लास तसेच सेमीकंडक्टर चिप भारतात उपलब्ध झाल्यानंतर, त्याची किंमत ४०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकते,” असे वेदांताचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी म्हटलं आहे.
फॉक्सकॉनसह कंपनीचा १.५४ लाख कोटी रुपयांचा नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याची घोषणा अगरवाल यांनी सीएनबीसी- टीव्ही १८ शी बोलताना केली आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी १२ सप्टेंबर रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत १.५४ लाख कोटी रुपयांच्या नवीन प्लांटसाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.
हे ही वाचा:
मैत्रिणीने आत्महत्या केल्याचे कळल्यावर तिनेही स्वतःला झोकून दिले
ईडी अधिकाऱ्यांना छाप्यात सापडलेल्या सोने, चांदीमुळे डोळे दिपले
एअर इंडियाच्या विमानातून निघाला धूर
मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच वेदांत प्रकल्प गुजरातला
महाराष्ट्र उत्पादन केंद्र
सध्या तैवान आणि कोरियामध्ये तयार होणाऱ्या ग्लासचे लवकरच भारतातही उत्पादन होणार आहे. देशाच्या उद्योजकीय क्षमता लक्षात घेऊन, वेदांता महाराष्ट्रामध्ये उत्पादन केंद्र बनवेल .मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अगदी इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) यांसारख्या उत्पादनांचे लक्ष्य असेल असे त्यांनी सांगितले.
आयतीवरील अवलंबित्व कमी होईल
गुजरातमध्ये उभ्या राहत असलेल्या या प्रकल्पातून दोन वर्षानंतर उत्पादन सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू होणार आहे. . या प्रकल्पामुळे आयतीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल असे म्हटले जात आहे.
वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त करारातून महाराष्ट्रात होऊ घातलेला सेमीकंडक्टरचा उद्योग आता गुजरातला गेला आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे.