वेदांता समूह भारतात करणार २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

वेदांता समूह भारतात करणार २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूह भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), शिपिंग कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान कॉपरच्या खाजगीकरणासह भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

“आमची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहोत.” वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना अग्रवाल म्हणाले, “लोकशाही देशात सरकार व्यवसाय चालवत नाही. खाजगीकरणामुळे देशाची स्थायी मालमत्ता तीनपट वाढू शकते. त्यामुळे खाजगीकरण एक चांगला पर्याय आहे”.

“आम्ही बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान कॉपरचे मूल्यमापन करत आहोत, जर या कंपन्यांचे खाजगीकरण केले गेले आणि बीपीसीएल आमच्याकडे आले, तर लोक सर्वात जास्त आनंदी होतील कारण आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही.” असं अग्रवाल म्हणाले.

सरकारने ” कंपन्या जेथे आहेत, ज्या स्थितीत आहेत,तशा विकल्या पाहिजेत जेणेकरून खाजगीकरण वेगाने होईल. आमच्या समूहाने $१० अब्ज साठी निधी दिला आहे आणि त्यांना काही गुंतवणूकदारांकडून “उत्तम प्रतिसाद” मिळाला आहे.” असं अग्रवाल म्हणाले.

“सरकार येत्या महिन्यात निविदा सादर करण्याची तारीख जाहीर करू शकते. ही सर्व प्रक्रिया येत्या ३-४ महिन्यात पूर्ण व्हायला हवी.” असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

कोणाला मिळालं ‘हेलीकॉप्टर’ आणि कोणाला ‘शिलाई मशीन’?

मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

तुमच्या कंपन्यांना पर्यावरणवाद्यांकडून इतका विरोध का सहन करावा लागतो? या प्रश्नावर अग्रवाल म्हणाले की, “भारतात उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ नये यासाठी परदेशी संस्थांचा दबाव आहे, यासाठी ते पर्यावरणवाद्यांचाही वापर करत आहेत.”

ते म्हणाले, “जगाला असं वाटतं की, भारताने उत्पादन करू नये, तर संपूर्ण जगाची बाजारपेठ असावी. आम्हाला आयात-आधारित देश असण्याची गरज नाही.”

Exit mobile version