युपीआयचा नवा रेकॉर्ड; नोव्हेंबर महिन्यात १७.४० लाख कोटींचे व्यवहार

रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंट करण्याला अधिक प्राधान्य

युपीआयचा नवा रेकॉर्ड; नोव्हेंबर महिन्यात १७.४० लाख कोटींचे व्यवहार

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये नवा उच्चांक गाठला आहे. १७.४० लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा १७.१६ लाख कोटी इतका होता. नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामामुळे युपीआयमधून होत असलेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये युपीआयमधून होणाऱ्या व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नवा रेकॉर्ड बनला आहे. तब्बल १७.४० लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले. तर, ऑक्टोबर महिन्यात हा आकडा १७.१६ लाख कोटी इतका होता. सप्टेंबरमध्ये या व्यवहारांची संख्या १०.५६ लाख कोटी इतकी होती. ज्याचे मूल्य १५.८ ट्रिलियन रुपये होते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ते ५४ टक्क्यांनी जास्त आणि मूल्यात ४६ टक्क्यांनी जास्त होते.

हे ही वाचा:

गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”

महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार

२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

आजकाल लोक रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंट करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात. शिवाय नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण असल्याने हे व्यवहार आणखी वाढले. NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये ४९.३ कोटी व्यवहारांद्वारे ५.३८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत युपीआय व्यवहारांची संख्या दररोज १०० कोटींचा आकडा पार करेल तसेच पाच वर्षांत दुकानातील ९० टक्के व्यवहार हे युपीआयद्वारे होतील, अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version