युपीआयवर आता २ हजारांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

युपीआयवर पीपीआय शुल्क आकारण्याची शिफारस.एक एप्रिलपासून अंमलबजावणी ,

युपीआयवर आता २ हजारांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. गुगलपे, फोनपे, पेटीएमवर व्यवहारांना जास्त पसंती मिळत आहे. अगदी लाने व्यवहारही ऑनलाईन केले जात आहेत. पण आता हे ऑनलाईन व्यवहार करणे खिशाला थोडे जड जाणार आहे. गुगलपे, फोनपे, पेटीएमवर सारख्या डिजिटल माध्यमातून २,००० पेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. एक एप्रिल पासून या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क ग्राहकांना भरावे लागणार आहे.

युपीआयवर २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यापारी व्यवहार केल्यास व्यवहार मूल्याच्या १.१ टक्के शुल्क आकारले जाईल असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. युपीआयवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स अर्थात पीपीआय शुल्क आकारण्याची शिफारस करण्याचे एक पत्रकनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

हे ही वाचा:

मी आता डॉक्टर झालेलो नाही याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात

हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय व्यवहारांच्या रकमेवर शुल्क आकारल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. युपीआयद्वारे बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. देशातील सर्वाधिक ९९.९ टक्के युपीआय व्यवहार फक्त बँक खात्यांद्वारे केले जातात असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

या परिपत्रकानुसार, गुगलपे, फोनपे, पेटीएमवर किंवा इतर अॅप्सद्वारे केलेल्या रकमेवर १.१ टक्क्यांपर्यंत इंटरचेंज दर भरावा लागेल. युपीआयद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे भरले तरीही कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यासोबतच ग्राहकाला युपीआयआधारित अॅप्सवर बँक खाते, रुपे क्रेडिट कार्ड उघडण्याचा पर्याय असेल. प्रीपेड वॉलेटचा वापर करता येऊ शकेल असे एनपीसीआयने म्हटले आहे.देशातील ग्राहक आणि व्यापार्‍यांसाठी दर महिन्याला ८ अब्ज युपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत केले जातात असे एनपीसीआयने म्हटले आहे.

Exit mobile version