25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरअर्थजगतUPI चा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये ४.२२ अब्ज पेमेंट!

UPI चा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये ४.२२ अब्ज पेमेंट!

Google News Follow

Related

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे केलेल्या पेमेंटचा विक्रम प्रस्थापित झाला असून त्याचे प्रमाण सप्टेंबर २०२१ मध्ये ३.६६ अब्ज व्यवहारांच्या तुलनेत वाढून ४.२२ अब्ज झाले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये व्यवहार मूल्य देखील सप्टेंबरमधील ६.५४ लाख कोटी रुपयांवरून ७.७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. डॉलर मूल्यामध्ये, UPI ने ऑक्टोबरमध्ये डॉलर १०३ अब्ज व्यवहार मूल्यासह प्रथमच डॉलर १०० अब्ज मासिक व्यवहार पार केले.

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना महामारीमुळे लादलेल्या लॉकडाऊन निर्बंधांमुळे UPI व्यवहार तुलनेने कमी झाले होते. UPI ही भारतामध्ये वापरली जाणारी मोबाईल- आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे ज्या माध्यमातून प्रत्येक वापरकर्त्याला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून कधीही पेमेंट करता येते.

हे ही वाचा:

मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या चौघांना फाशी

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, यामुळे पैसे पाठवणाऱ्याने बँक खात्याची माहिती उघड करण्याचा धोका टळतो. UPI हे P2P किंवा Person to Person आणि P2M किंवा Person to Merchant अशा दोन पद्धतीने पेमेंट करण्याचे पर्याय देते, तसेच वापरकर्त्यांना पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याचीही परवानगी दिली जाते.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालात असे म्हटले आहे की, UPI चा बाजार हिस्सा आर्थिक वर्ष २०२२ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांत ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ७३ टक्के होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा