डिजिटल ग्रंथालये, शिक्षकांची भरती , नर्सिंग महाविद्यालये आणि खूप काही…

अंत्योदय योजने'चा गरिबांना मिळणार लाभ 

डिजिटल ग्रंथालये, शिक्षकांची  भरती , नर्सिंग महाविद्यालये आणि खूप काही…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहेत. हा देशाचा ७५ वा अर्थसंकल्प आहे. आणि सीताराम न सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. ‘अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे’, जो आधीच्या अर्थसंकल्पात रचलेल्या पायावर आधारित आहे. आम्हाला असा भारत हवा आहे, जिथे महिला, शेतकरी, अनुसूचित जाती या सर्वांना स्थान मिळेल.असे अर्थमंत्री सीतारामन या वेळेस म्हणाल्या.  निर्मला सीतारामन गेल्या चार अर्थसंकल्पापासून काही ना काही नवीन करत आहेत. मग ते ब्रीफकेस असो, पेपरलेस बजेट असो किंवा सर्वात दीर्घ बजेट देण्याचे भाषण असो. आजच्या अर्थसंकल्पात गरिबांसाठी मोफत अन्नधान्य आणि आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

 

आजच्या अर्थसंकल्पात आदिवासीं भागासाठी विशेष शाळा तसेच शाळकरी मुलांसाठी करणार डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती, या आहेत शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.  राजधानी दिल्लीत दुर्मिळ आणि चांगल्या पुस्तकांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा केंद्र सरकारने संकल्प केला आहे. त्याबरोबर केंद्राने आपल्या राज्यांत नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून देशभरात एकूण ३८००० शिक्षकांची भरती होणार आहे याशिवाय शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहेत. याशिवाय वैद्यकीय शिक्षणासाठी १५७ नवीन महाविद्यालये तसेच १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये उघडली जाणार आहेत.

आजच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून आदिवासी विकास मिशनची घोषणा करण्यात आली असून यात आदिवासी साठी विशेष शाळा उघडल्या जाणार आहेत. आदिवासी विभागासाठी एकूण १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा आज झाली आहे. यांत एकलव्य मॉडेल अंतर्गत निवासी शाळा उघडण्यात येणार असून ३८ हजार शिक्षक भरती करून त्याचा लाभ साडेतीन लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाडिजिटल लायब्ररी होणार आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी अजून चांगल्या संस्था उभ्या करणार. लहान तसेच किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी केंद्रात स्थापन करणार. स्किल इंडिया अंतर्गत नवीन ३० सेंटर्स स्थापन करणार.

कौशल्य विकास मध्ये राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजनेअंतर्गत ४७ लाख तरुणांना लाभ मिळणार तर , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्चला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून त्यांना पाठिंबा दिला जाणार आहे . आणखी महत्वाचे म्हणजे आर्थिक साक्षारतेला चालना देण्यासाठी भर दिला आहे.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

आणखी एक वर्ष मोफत रेशन, ८० कोटी गरिबांना मिळणार लाभ 
मोदी सरकारने गरिबांसाठी कल्याणकारी योजना असलेल्या ‘अंत्योदय योजने’चा कालावधी आता आणखी एक वर्ष वाढवला असून आज 2023 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार दोन लाख कोटी रुपये खर्च करणार यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा पुढील एक वर्षासाठी वाढवण्यात आला आह

आगामी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकी पूर्वीचा आणि चालू वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणूक समोर ठेऊन मोदी सरकारचा आज चा शेवटचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. तर मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.

Exit mobile version