देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोविडचे नकारात्मक परिणाम हळूहळू कमी होत आहेत. देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत बेरोजगारीच्या दरात झालेली घसरण याची साक्ष आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त अधिक वयोगटाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर घसरला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील हा दर ८.७ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर आले आहे.
गेल्या वर्षात जुलै-सप्टेंबरमध्ये देखील बेरोजगारीचा दर ७.२ टक्के होता. त्याआधी एप्रिल-जून या कालावधीत तो ७. ६ मध्ये टक्के आणि जानेवारी-मार्चमध्ये ८. २ टक्के होता. कोविड काळातीळ निर्बंधांच्या परिणामांचा भाग म्हणून ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर होते . याशिवाय महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण २०२१ वर्षातील १०. ५ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या वर्षात ९. ६ टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण १५ वर्ष आणि त्या पेक्षा जास्त वयोगटातील महिलांचे आहे. हे प्रमाण जुलै-सप्टेंबर २०२२ मध्ये ९.४ टक्के, एप्रिल-जून २०२२ मध्ये ९.५ टक्के आणि जानेवारी-मार्च २०२२ मध्ये १०.१ टक्के होता.
पुरुषांमध्ये, शहरी भागातील बेरोजगारी प्रमाण ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ८.३ टक्के होते जुलै-सप्टेंबर २०२२मध्ये हा दर ६.६ टक्के, एप्रिल-जून २०२२ मध्ये ७.१ टक्के आणि जानेवारी-मार्च २०२२ मध्ये ७.७ टक्के होता.
हे ही वाचा:
आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?
जर्जर बापट घराबाहेर पडले, पण ठाकरे घरीच…
कणेरी मठात ५२ गाई दगावल्या, तर ३० गंभीर
जर्जर बापट घराबाहेर पडले, पण ठाकरे घरीच…
शहरी भागात १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचा देशातील श्रमशक्तीचा सहभाग दर चालू तिमाहीत वाढून ४८.२ टक्के झाला आहे. अधिकच्या एका वर्षापूर्वी याच कालावधीत हा दर ४७.३ टक्के होता. जुलै-सप्टेंबर २०२२ मध्ये हा दर ४७. ९ टक्के आणि एप्रिल-जून २०२२ मध्ये ४७.५ टक्के होता असेअसे अहवालामध्ये म्हटले आहे.