युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला

युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधल्या युद्धाची झळ पुन्हा एकदा शेअर बाजाराला बसली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली आहे. दरम्यान शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत असल्याची माहिती आहे.

हिंदाल्को २.६७ टक्क्यांनी वाढून ५९९ रुपयांवर, ओएनजीसी १.७२ टक्क्यांनी वाढून १६८ रुपयांवर, कोल इंडिया १.९३ टक्क्यांनी वाढून १८४ रुपयांवर आणि टाटा स्टील १.६१ टक्क्यांनी वाढून १२९७ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर, आयसीआयसीआय बँक ५.१४ टक्के, बजाज फायनान्स ५.४२, मारुती सुझुकी ६.२७ टक्के, टाटा मोटर्स ४.०५ टक्के, अॅक्सिस बँक ३.९७ टक्के, लार्सन ४.७० टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.९२ टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.

जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे. बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील सर्व ३० स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीतील ५० पैकी ४६ शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

हे ही वाचा:

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उसळी मारली आहे. ब्रेंट क्रूडचे दर १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

Exit mobile version