कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवार, २ सप्टेंबर रोजी बँकेने शेअर बाजारांना पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. उदय कोटक हे बँकेत बिगर कार्यकारी संचालक म्हणून कायम राहणार आहेत.
उदय कोटक यांनी राजीनामा दिल्यानंतर अंतरिम व्यवस्थेनुसार उदय कोटक यांच्या जागी सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता ३१ डिसेंबरपर्यंत बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत. मात्र, यासाठी बँकेला आरबीआय आणि बँकेच्या सदस्यांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून उदय कोटक यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपणार होता. बँकेच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात उदय कोटक म्हणाले, “मी या अद्भुत कंपनीचा संस्थापक, प्रवर्तक आणि महत्त्वपूर्ण भागधारक म्हणून एकटा उभा होतो. या बदलत्या काळात मी पुढील वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” २ सप्टेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कोटक यांनी सांगितले की, बँकेची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ते पद सोडत आहेत.
हे ही वाचा:
लाठीचार्ज केला नसता तर पोलिसांची अवस्था वाईट झाली असती!
ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे दोन अधिकाऱ्यांसह एक दोषी
डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!
“कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष, मी आणि आमचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक या तिघांनाही या वर्षाच्या अखेरीस पायउतार व्हायचे आहे. त्यामुळे सध्या माझे मुख्य लक्ष उत्तराधिकार नियोजनावर आहे. बँक प्रणालीत एक सुरळीत व्यवस्था असली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. या सर्व पदांसाठीची प्रक्रिया मी आता सुरू करीत आहे आणि त्यासाठी मी स्वतः सीईओ पदावरून पायउतार होत आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.