लेखक, अभिनेते, व्याख्याते, अर्थ अभ्यासक, उद्योजकता सल्लागार, आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार दीपक करंजीकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे येथील नौपाडा भागातील सहयोग मंदिर सभागृहात शुक्रवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परम मित्र पब्लिकेशन्स आयोजित लेखक दीपक करंजीकर यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन कार्यक्रमाला राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि सावित्रीबाई बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अर्थतज्ज्ञ Who Painted My Money White या बहुचर्चित इंग्रजी पुस्तकाचे लेखक श्री अय्यर उपस्थित रहाणार आहेत.
हे ही वाचा:
भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक
न्यायव्यवस्थेवर केलेली टीका संजय राऊतांना भोवणार
नागालँडमधील फुटीरतावादी संघटनां सोबतच्या युद्धविराम कराराला मुदतवाढ
दिल्लीच्या जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
विघ्न विराम हे पुस्तक Who Painted My Money White या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद स्वरूपात प्रसिद्ध होत आहे. ‘अस्वस्थ सूत्र’ शापित वाटेवरील अफगाणिस्तान या पुस्तकातून अफगाणिस्तानचा इतिहास, तालिबान काळ, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील आक्रमण, सद्यस्थिती आणि त्याच्याशी जोडलेले आंतरराष्ट्रीय कूट नीतीचे ताणेबाणे याचा वेध घेण्यात आला आहे.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला वाचकांनी, पुस्तक प्रेमींनी मोठया संख्येने यावे असे आवाहन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, परम मित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी, सुजय पतकी यांनी केले आहे.