विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला ७ ते ८ टिशीच्या घोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना पश्चिम रेल्वे च्या बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी ७ ते ८ अनोळखी टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या टिसींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
जुबेर अहमद (२७) असे मारहाण करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जुबेर हा पालघर येथे राहणारा आहे, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जुबेर हा ट्रेनने बोरिवली रेल्वे येथे आला असता तिकीट तपासनीस यांनी त्याच्याकडे प्रवासाचे तिकीट विचारले, परंतु जुबेर कडे तिकीट नसल्यामुळे त्याला विनातिकीट प्रवास प्रकरणी टीसीने ताब्यात घेऊन दंड भरण्यासाठी फलाट क्रमांक ८ येथील टीसी कार्यालयात आणले.
हे ही वाचा:
नीट यूजी परीक्षा रद्द होणार नाही, पुन्हा परीक्षा नाही…सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
करदात्यांना दिलासा, शेअर मार्केटला झटका
पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !
‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?
जुबेर यांच्याकडे टीसीने दंडाची रक्कम भरण्यास सांगितले असता टीसी आणि जुबेर यांच्यात शाब्दिक वाद झाला, या वादातून कार्यालयात बसलेल्या ७ ते ८ टीसीनी जुबेरला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. जुबेरने दंडाची रक्कम भरून स्वतःची सुटका करून थेट बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठले.
रेल्वे पोलीस ठाण्यात जुबेर याने त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी जुबेर ला वैद्यकीय उपचारा साठी रुग्णालयात पाठवून बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात ७ ते ८ अनोळखी टीसी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टीसीची ओळख पटविण्यासाठी टीसी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्या टीसीची ओळख पटविण्यात येत असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खुपेरकर यांनी दिली आहे.