‘या’ कंपनीत मिळणार २८ हजार तरुणांना नोकऱ्या

‘या’ कंपनीत मिळणार २८ हजार तरुणांना नोकऱ्या

Corporate Business, Indian, Office - Group of Customer Service Executives Attending Calls at a Busy Call Centre

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आपल्या नोकऱ्यांना मुकावं लागलं होतं. अशातच काही कंपन्यांना मात्र नवोदितांना नोकरीच्या संधी देत त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली. अशाच कंपन्यांमधील एक नाव म्हणजे कॉग्निझंट. आईटी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी कॉग्निझंट नं भारतात २०२१ या वर्षात २८,००० फ्रेशर्सना नोकरीची संधी देण्याचा निर्णय़ घेतला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये या कंपनीकडून १७ हजार जणांना नोकरीची संधी दिली होती.

कॉग्निझंटमध्ये सध्या २,९६,५०० कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यापैकी एकट्या भारतात २ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. कंपनीचे सीईओ, ब्रायन हम्फ्रीज यांनी दिलेल्या माहितीनुसार एट्रिशनवर कंपनीकडून भर दिला जात आहे. मागील काही महिन्यांमध्ये आलेल्या राजीनाम्यांच्या धर्तीवर ही वाढ पाहायला मिळेल. कारण, भारतामध्ये नोटीस पीरियड कालावधी २ महिन्यांचा होता. कंपनीतून राजीनामा देणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही आता येत्या काळात नव्यानं मोठ्या संख्येनं नवोदितांना या कंपनीत काम करण्याची संधी चालून येणार आहे.

कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीप्रमाणं सध्या कॉग्निझंटकडून मल्टीपार्ट प्लॅनवर काम सुरु आहे. यामध्ये अंतर्गत व्यवस्थापन, प्रशिक्षण उपक्रम, जॉब रोटेशन, आणि अंतर्गत संधींमध्ये वाढ असे अनेक पर्याय कर्मचाऱ्यांसाठी खुले असतील. या माध्यमातून मनुष्यबळावरही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. याशिवाय तिमाही पगारवाढ आणि पद बढती, हाय स्कील डिमांड अशा उपाययोजनाही अंमलात आणण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा

सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!

पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक

अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे पाठ फिरवल्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. यासाठीच आता पुन्हा नव्यानं या क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी कॉग्निझंटक़डून इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Exit mobile version