मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

मोदी सरकारने देशातील एअर कंडिशनर (एसी) आणि एलईडी उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. यासाठी सरकारने या वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ४५०० कोटी रुपयांचा इनसेंटिव्ह (प्रोत्साहन) दिलाय. या निर्णयामुळे देशात रोजगाराची संख्या वाढेल आणि एसी आणि एलईडी या वस्तू देशाबाहेरुन आयातही कराव्या लागणार नाहीत, अशी भूमिका सरकारने मांडली आहे. स्वतः केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

पीयूष गोयल म्हणाले, “या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या तयार होतील. त्याशिवाय वीजेच्या किमतीवरही नियंत्रण येईल. या निर्णयामुळे थेट स्वरुपात जवळपास ३२ हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास १ लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतलाय. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केलीय.”

हे ही वाचा:

वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात ७०-८० टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात ही परिस्थिती आहे. म्हणूनच सरकारने यासाठी पीएलआय योजनेची घोषणा केलीय. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा सीएजीआर १५-२० टक्के आहे,” असंही गोयल यांनी नमूद केलं.

Exit mobile version