कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या राज्यात लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे अनेकांचे रोजगार आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे उत्पन्नाचे स्रोत आटल्याने अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्डाड कोसळली आहे. मात्र, या परिस्थितीमध्येही भारतातील टीसीएस आणि इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी हजारो नव्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत.

भारतातील टीसीएस आणि इन्फोसिस या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस मध्ये तब्बल चाळीस हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत टीसीएसला जबरदस्त नफा झाला होता. आगामी काळासाठीही कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाले आहेत. त्यासाठी टीसीएसकडून चाळीस हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

हे ही वाचा:

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

भारताची दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस २०२१-२२ या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून २६ हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट (कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा दर) १५ टक्के होता. जुलै २०२१ पासून कंपनीने सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिलीय. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे इन्फोसिसकडून सांगण्यात आले.

Exit mobile version