शेअर बाजारात सध्या पडझड सुरूच आहे. गुरुवार १९ मे रोजी म्हणजे आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स तब्बल हजार अंकांनी आणि तर निफ्टी तीनशे अंकांनी कोसळला आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने शेअर बाजारात पडझड होत असल्याचे म्हटले जात आहे.
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. क्षणार्धात गुंतवणूक दारांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बुडाली आहे. बुधवार, १८ मे रोजी, एकूण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपये होते ते आज ४ लाख ८० हजारांनी घसरून २ कोटी ५० लाख ९६ कोटींवर आले आहे.
प्री-ओपनिंग सत्रात बाजारात कमजोरी दिसून येत आहे. निफ्टी १५ हजार ९०० च्या खाली आला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स १ हजार २३ अंकांनी टक्क्यांनी घसरून ५३ हजार १८४.८८ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी ३५०.४० अंकांनी घसरून १५ हजार ८८९.९० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच आशियाई बाजारातही आज कमजोरी दिसून आली आहे.
हे ही वाचा:
दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्तेच भिडले
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
दरम्यान, महागाईचा वाढता दर, पुरवठा साखळीतील समस्या, रशिया-युक्रेन युद्ध, महामारीमुळे चीनमधील लॉकडाऊन आणि दर वाढीच्या चक्रासह आर्थिक मंदीचा परिणाम शेअर बाजारांवर होत आहे. आर्थिक मंदीच्या चिंतेमुळे वाढीच्या साठ्यातही घसरण दिसून आली.