शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत

शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत

आज, १८ एप्रिल रोजी चार दिवसांनी शेअर बाजार उघडला. आज शेअर बाजारात आठवड्याची सुरवात फारशी चांगली झालेली नाही, तर दुसरीकडे सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बाजार उघडताच शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिले आहे.

आठवड्याच्या सुरवातीला जवळपास सेन्सेक्स १ हजारांनी घसरून ५७ हजार ३३८.५८ वर सुरु झाला. तर निफ्टी जवळपास २९२ अंकांनी घसरून १७ हजार १८३.४५ वर सुरु झाला आहे. निफ्टीमध्ये ५० शेअर्स पैकी केवळ ८ शेअर्स वधारले आणि बाकीच्या ४२ शेअर्समध्ये घट झाली आहे. यापूर्वी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर राहिला होता. मागच्या आठवड्याच्या बाजाराच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स २३७.४४ अंकांनी घसरून ५८ हजार ३३८.९३ वर बंद झाला होता. तसेच निफ्टी ५४.६५ अंकांनी घसरून जवळपास १७ हजार ४७५ वर बंद झाला होता.

हे ही वाचा:

मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू 

महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला झोडपले

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

दुसरीकडे, शेअर बाजार घसरले असताना मात्र सोनं चांदीच्या दारात वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव ०.७५ टक्क्यांनी वाढून ५३ हजार ३९२ रुपये, तर चांदीचा भावही १.३४ टक्क्यांनी वाढून ६९,९५७ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली आहे. वर्षभरात सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७ हजार ८९० रुपये इतकी होती. आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३ हजार ४५० रुपये प्रति तोळा पोहचला आहे.

Exit mobile version