आज शेअर बाजार उघडताच बाजाराची नकारात्मक सुरवात झाली आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ५७ हजार १९० वर सुरु झाला तर निफ्टी १५० अंकांनी घसरून १७ हजार ९४ वर सुरु झाला.
जागतिक शेअर बाजारातही आज नकारात्मक वातावरण दिसून आले. बुधवारी अमेरिकन बाजारातील तीन प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली होती. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. युक्रेन-रशिया युद्ध थांबत नसल्याने देखील जागतिक स्तरावरील एक्सचेंजमध्ये पडझडीचे सत्र सुरुच आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे.
सेन्सेक्सचे ३० पैकी १८ शेअर्स घसरले आहेत आणि निफ्टीच्या ५० पैकी २८ शेअर्स घसरले. तर निफ्टी बँकेच्या बारा पैकी सात शेअर्सची विक्री दिसून आली. बाजारात सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयातही कमजोर झाला आहे. रुपाया १८ पैशांनी कमजोर होऊन ७६.३१ वर बंद झाला आहे. बँका, रिअल इस्टेट, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका
पुण्यातील फार्मा कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला
जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना
दोन दिवसाच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात पडझड झाली आहे. कालच्या दिवशी १ हजार ४२४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर १ हजार ८९१ शेअर्समध्ये घसरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर ११८ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेले नव्हते.