अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर कर धोरणाचे परिणाम जगभरात दिसून येत आहेत. एकीकडे टॅरिफ वॉरमुळे अमेरिकन शेअर बाजारावर याचे गंभीर परिणाम दिसत असतानाचं आता दुसरीकडे आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार तब्बल २६०० अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही मोठी पडझड झाली. निफ्टी थेट २१,८०० अंकांच्या खाली गेला आहे.
शुक्रवारी बीएसईचा सेन्सेक्स ९३०.६७ अंकांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी घसरला होता. ७५,३६४.६९ वर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी ३४५.६५ अंकांनी किंवा १.४९ टक्क्यांनी घसरून २२,९०४.४५ वर बंद झाला होता. सोमवारी भारतीय शेअर बाजारासाठी आधीच जागतिक बाजारातून घसरणीचे संकेत मिळाले होते. त्यानुसार बाजार उघडताच हाहाःकार उडालेला दिसला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या कर धोरणामळे जागतिक पातळीवर मोठ्या उलाढाली पाहायला मिळत आहेत. केवळ भारतातचं नव्हे तर विविध देशांच्या शेअर बाजारात दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. सोमवारी तैवानचा शेअर बाजार ९.८ टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार ६.४ टक्क्याने घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात ५.५ टक्के तर मलेशियात ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत. कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल ६० रुपयांवर पोहोचला आहे. तर रुपयाही ५० पैशांनी महागला आहे. रुपया ८५.२४ वरुन ८५.७४ प्रति डॉलरवर गेला आहे. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतणुकदारांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा :
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
सूर्य तिलक पाहताच रामभक्त भावविभोर
रामभक्तांवर फुले उधळत इक्बाल अन्सारी काय म्हणाले?
विविध गटांकडून ‘ब्राह्मणां’ना केले जाते आहे लक्ष्य…माधव भांडारी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल
हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, नेसले इंडिया, एशियन पेंट्स, टायटन, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व्, अल्ट्रा सिमको, मारूती यांच्या शेअर्समध्ये पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मोठी घसरण दिसून आली. परिणामी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स थेट २५०० हून अधिक अंकांनी घसरला.