आज, १६ सप्टेंबरला सुरुवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात पडझड होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स तब्बल एक हजारांच्या अंकांच्या घसरणीसह ५८ हजार ८७७ वर बंद झाला. तर निफ्टी ३४६ अंकांच्या घसरणीसह १७ हजार ५३० वर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद होताना तब्बल ४८ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर फक्त दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. आज सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात पडझड कायम होती. शेअर्समध्ये चढ उतार दिसून आले. अखेर शेअर बाजार बंद होताना तब्बल ४८ शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर फक्त दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली. CIPLA आणि INDUSINDBK या दोन शेअर्समध्ये तेजी होती. आज आयटी, फार्मा आणि बँकीगचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
शेअर बाजाराचं सेन्सेक्स २३३ अंकांच्या घसरणीसह ५९ हजार ७०० वर सुरु झाला होता. तर निफ्टी ९६ अंकांच्या घसरणीसह १७ हजार ७८१ वर सुरु झाला होता. मात्र, सेन्सेक्स निफ्टी तेजीत न येता आणखी कोसळू लागला. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली त्यामुळे त्यांच्या कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार
मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार
‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं
अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई आणि भारतीय शेअर बाजारावर दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकात जून २०२० नंतरची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.