देशात इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या मागणीला सरकार ही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. तसेच देशांतर्गत वाहन उद्योजक २०३० पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री वेगाने वाढण्याची अपेक्षित असून, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत वाटा हा ५० ते ७० टक्के असेल असे एका अहवालात म्हटले आहे.
असोसिएशन ऑफ ऑटो पार्टस मॅन्युफ्रॅक्चरर्स (एसीएमए) आणि मॅकिन्से यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्री वाढत चालल्या आहे. त्याच आधारावर व्यावसायिक वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची एकूण किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली असून ग्राहकांचे इलेक्ट्रिक वाहनांबद्दल आकर्षण ही वाढले आहे. देशात २०३० पर्यंत प्रवासी वाहनाचा वाट १० ते १५ टक्के वाढलेला असून व्यावसायिक वाहनाची क्षमता चार्जिंग सुविधेमूळे ५ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात
जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार
गेल्या वर्षी एकूण दुचाकीची दोन लाख ३१ हजार ३३८ विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक वाहने अजून तरी विकसित होत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनमध्ये बिघाड होऊन आग लागण्याचे प्रकार अजूनही होत आहेत. आग न लागण्या संदर्भात अजून ही इलेक्ट्रिक वाहनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. आम्हाला आगीवर काय उपाययोजना करावे ते माहीत नव्हते. असे मत महिंद्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी मांडले.