नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्रातील ६ कफ सिरप उत्पादकांचा परवाना निलंबित

राज्यातील १०८ पैकी ८४ कफ सिरप उत्पादकांची चौकशी सुरू केली आहे. यातील चार कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्रातील ६ कफ सिरप उत्पादकांचा परवाना निलंबित

महाराष्ट्र सरकारने राज्यातील १०८ पैकी ८४ कफ सिरप उत्पादकांची चौकशी सुरू केली आहे. यातील चार कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कफ सिरप औषध निर्मिती करणाऱ्या ६ कंपन्यांचे परवाने निलंबित केले आहेत . या कंपन्यांनी परवान्याचे नियम पाळले नाहीत, त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सरकारने विधानसभेत सांगितले. आमदार आशिष शेलार आणि अन्य सदस्यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेला विधानसभेत उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील १०८ पैकी ८४ कफ सिरप उत्पादकांची चौकशी सुरू केली आहे. यातील चार कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री संजय राठोड म्हणाले की, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

हे ही वाचा :

ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा

स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर

हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

शेलार यांनी गांबियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. या प्रकरणात, मंत्री म्हणाले की या प्रकरणात ज्या कंपनीवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे ती हरियाणात आहे आणि तिचे महाराष्ट्रात कोणतेही उत्पादन युनिट नाही . मंत्री संजय राठोड म्हणाले की, आम्ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. राज्यातील ९९६ अॅलोपॅथी औषध उत्पादकांपैकी ५१४ उत्पादक त्यांची उत्पादने निर्यात करतात. उत्तर प्रदेशातील नोयडास्थित कंपनीने बनवलेले कफ सिरप प्यायल्याने गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली असल्याचे नोयडा पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version